अहमदनगर ते कडा रेल्वे ट्रॅकची चाचणी यशस्वी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  नगर ते कडा या 60 किमी अंतरावर रेल्वे ट्रॅकची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली आहे.

या ट्रॅकचे यशस्वीरित्या काम होत असल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केला आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची अनेक दशकांपासून जनतेला प्रतीक्षा आहे.

सध्या या कामाने गती पकडली असून काही महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यातील ट्रॅकवर चाचणी झाली होती. आता थेट कड्यापर्यंत चाचणी झाल्याने या बहुप्रतीक्षीत रेल्वेने मराठवाड्यात प्रवेश केला आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सोशल मिडियावर या चाचणीबद्दल आनंद व्यक्त करीत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे स्वप्न लवकरच साकार होईल

असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान यामुळे विकासकामात देखील निश्चितच भर पडणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!