Ahmednagar Politics: शिवसेनेने अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून भाऊ कोरगावकर यांना हटविले आहे. त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांची नगर दक्षिण जिल्ह्यासाठी तर उत्तर नगर जिल्ह्यात नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरगावकर यांना बदलण्यासाठी नगरमधून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने नव्या नियुक्त्या केल्याचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतही कोरगावकर यांच्याविरोधात तक्रारी सुरूच होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्यांचा निषेध करताना कार्यकर्त्यांनी कोरगावकर यांच्यावरही रोष व्यक्त केला होता. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिर्डीत आले होते तेव्हा युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हा बदल झाला आहे.