Ahmednagar News : व्हायरल व्हिडिओतील ‘त्या’ संतप्त आजीबाईंना अखेर विखे पाटलांची साखर मिळाली!आजी म्हणतात आधी खोटी माहिती दिली…

Published on -

Ahmednagar News : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सध्या दक्षिणेतील विविध मतदार संघातील गावात साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. परंतु या साखर पेरणीत अनेक ‘कडू’ विघ्न आले.

सुरवातीला उत्तरेत साखर वाटप झाली. राजकीय टीकेनंतर दक्षिणेतही साखर वाटप सुरूझाली. परंतु दोन दिवसांपूर्वी शेवगाव मधील बोधेगाव येतघील एक व्हिडीओ व्हायरल होत होता.

यात एक आजी संतप्त होत आम्हाला साखर मिळाली नसल्याचं सांगत होत्या. आता याच आजीबाईंनी आपल्याला विखे पाटील यांच्याकडून साखर मिळाली असल्याचे सांगितले आहे.

काही कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिल्याने आमचा गोंधळ झाला असे आजीबाई नवीन व्हिडिओत सांगतायत.

सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात रेशनकार्ड धारकांना साखर आणि चना दाळ वाटप सुरु आहे. विशेष म्हणजे ही सरकारी योजना नसून विखे पाटील स्वखर्चाने हे वाटत आहेत. अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने

मतदारसंघात दुसरी दिवाळी साजरी करण्याचा विखे पाटील यांचा मानस असून गरिबांना मदत व्हावी म्हणून त्यांनी हे वाटप स्वतः केले आहे. परंतु या वाटप करताना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे गोंधळ उडाला होता. म्हणजे तसा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यातील महिलेने आपल्याला १९ तारखेला साखर मिळाल्याचे आता सांगितलं आहे.

काय म्हणायतेय आजीबाई ?

जुन्या व्हिडिओमध्ये आजीबाई संतप्त झालेल्या दिसत होत्या. आता त्याच आजीबाई खुश झाल्या आहेत. त्या सांगतायत की, त्यावेळीच येथे साखर वाटप करण्यात आली परंतु काही विरोधी कार्यकर्त्यांनी मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे आमचा गोंधळ उडाला. आम्ही आजही विखे पाटील परिवाराच्या सोबत आहोत. १९ तारखेला साखर मिळाल्याचे आजीबाई सांगत आहेत.

विखे पाटील यंत्रणा म्हणते ‘दक्षता’ घेऊ

सध्या विखे पाटील यांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना साखर व दाळ वाटप सुरु आहे. बोधेगावच्या घटनेनंतर विखे पाटील यंत्रणा सतर्क झाली आहे. यानंतर पुन्हा असा गोंधळ उडणार नाही,

चुकीची माहिती दिली जाणार नाही यासाठी दक्षता घेऊ असं विखे पाटील यांच्या यंत्रणेकडून आता सांगितले जात आहे. गोंधळाची चुकीची माहिती मुद्दाम प्रसारित केली जात असल्याचा आरोप या यंत्रणेने केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe