विजेची तार तुटून पडल्याने पाच एकर ऊस झाला खाक !’या’ ठिकाणी घडली ही दुर्घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  तोडणीला आलेल्या पाच एकर क्षेत्रावरील उसात स्पार्क होऊन उच्च दाबाची विजेची तार तुटून पडल्याने संपूर्ण पाच एकर क्षेत्रावरील ऊस या आगीत खाक झाला.

ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे घडला आहे. याप्रकरणी संवत्सर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक त्रंबकराव व विमल परजणे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून महावितरण कंपनीने सर्व नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत त्रंबकराव परजणे यांनी दिलेली माहिती अशी की, करंजी शिवारात ५ एकर उसाचे क्षेत्र असुन, तो परिपक्व होवुन चालु गळीतास फेब्रुवारी अखेर येणार होता.

परंतु काल सकाळी ११ केव्हीए वीज क्षमतेच्या वाहिन्या अचानकपणे तुटून उसावर पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले व सर्व ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला .

याबाबत सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेने पेटलेला. उस विझविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. सर्वच्या सर्व पाच एकर क्षेत्रावरील तोडणीस आलेला उस जळून गेला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe