धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस ४ महिन्यांची शिक्षा ! रेणुकामाता मल्टिस्टेट सोसायटीतील प्रकरण

Ahmednagar News

Ahmednagar News  : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस कोर्टाने ४ महिने कारावास तसेच ४६ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

रियाज अन्वर शेख असे आरोपीचे नाव आहे. अहमदनगर येथील १२ वे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एच. आर. जाधव यांनी या खटल्याचा निकाल दिला.

या खटल्याची थोडक्यात हकिगत अशी की, श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपर. अर्बन क्रेडिट सोसायटीकडून रियाज अन्वर शेख यांनी कर्ज घेतले होते. थकित कर्जापोटी त्यांनी २१ हजार ११० रुपयांचा धनादेश दिला होता.

तथापि तो धनादेश वटला नाही. म्हणून रेणुकामाता मल्टिस्टेटने रियाज अन्वर शेख याच्याविरुद्ध चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टात खटला दाखल केला. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांच्यासमोर झाले.

कोर्टाने आरोपी रियाज अन्वर शेख यास ४ महिन्याची सश्रम कारावास तसेच ४६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रक्कम न भरल्यास १ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावली. फिर्यादीतर्फे धिरज आव्हाड यांची साक्ष महत्वाची ठरली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe