Ahmednagar News : संगमनेर येथे कारागृहात न्यायालयीन कोठडी मधील 4 आरोपी 8 नोव्हेंबरला कारागृहातून पळून गेले होते.
या आरोपींना काल जामनेर येथून जेरबंद करण्यात आले. या आरोपींनी जेवणासाठी मित्राकडून चहावाल्याच्या फोन पे वर पैसे मागविले अन तिथेच ते फसले.व अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तांत्रिक तपास करुन चार आरोपींसह त्यांना मदत करणार्या दोघांना बेड्या ठोकल्या.
इतका मुद्देमाल जप्त
आरोपींकडून १ गावठी कट्टा, सहा जीवंत काडतूस, मोबाईल असा दहा हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडूनन जप्त केला गेला आहे.
नेमके काय घडले
संगमनेर सबजेलमधील कैदी राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबू ढाले, मच्छिंद्र मनाजी जाधव हे सकाळी पावणे सातच्या दरम्यान बॅरेक क्रमांक ३ चे खिडकीचे गज कापून पळून गेले होते.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
पोलिस निरीक्षक आहेर यांनी विविध गोष्टींचा तपास करुन आरोपींना आणि त्यांना पळून जाण्यास मदत करणारे वाहन चालक व एक साथीदार अशा सहा आरोपींना जामनेर (जि. जळगांव) येथून वाहनासह पकडले.
एक महिन्यापासून सुरू होते नियोजन
धक्कादायक बाब म्हणजे कोठडीतून पळून जाण्याचा प्लॅन आरोपी एक महिन्यापासून करत होते. बराकीतील फॅन, कुलरचा आवाज सुरु असतांना गज कापण्याचे काम करत.
गज कापण्यासाठी लागणारे साहित्य कोणी पुरविले, आरोपींना कोणी मदत केली, याचाही तपास करण्यात येत आहे.