इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचे आमिष अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित इसमाची फसवणूक !

Ahmednagar News

Ahmednagar News : व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठवून घरपोहोच इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचे आमिष दाखवून एका इसमाने १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नगरमध्ये घडली.

याप्रकरणी नगर शहरातील माळीवाडा येथे राहणाऱ्या एका प्रतिष्ठित इसमाने बुधवारी (दि.२७) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यातील फिर्यादी यांना ४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी उत्सुक असाल तर १९४७ रुपये भरुन बुकिंग करा, असा मेसेज आला.

त्यानंतर त्यांनी १९४७ रुपये भरुन बुकिंग केले. पुन्हा त्या व्यक्तीने फिर्यादीला फोन करुन १८ हजार रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर स्कूटर घरपोहोच केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने पुन्हा १८ हजार रुपये त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर पाठविले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पुन्हा फोन करुन २९ हजार रुपये भरण्यास सांगितले.

त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीकडे पैसे परत मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर देण्याच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर २७ डिसेंबर रोजी फिर्यादीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe