नदीच्या पुलाखाली ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढल्याने खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील विशाल चंद्रकांत जपे (वय ४०) यांचा मृतदेह असल्याची माहिती मूकबधीर शाळेच्या शिक्षकांनी अमोल चंद्रकांत जपे यांना दिली.

त्यांनी माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्यांनतर ग्रामीण रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत असल्याचे घोषित केले.

यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ६३/२०२१ सीआरपीसी कलम १७४ नुसार नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन शेवाळे हे करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe