Ahmednagar News:मी लवकरच आपल्या भेटीला येत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या शिवसेनेची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. धनुष्यबाण आपला होता, आपला आहे, आणि आपलाच राहणार आहे.
असे मत माजी मुख्यमंत्री cयांनी व्यक्त केले.पारनेर येथे काल झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्याच्यावेळी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी मोबाईलद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी मोबाईलद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आज माझ्या हातात तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. आपल्याला अग्निपथावरून चालायचं आहे पाय भाजतील त्रास होईल संघर्ष करावा लागेल. तुम्ही सर्वजण तयार आहात का?
असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करताच.. साहेब आम्ही एक दिलाने आम्ही तुमच्या अजन्म सोबत आहोत, काळजी करू नका असा विश्वास पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुखांना दिला.