Ahmednagar News : व्यवसायासाठी दिड कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याला २३ लाख रुपयांना गंडा !

Published on -

Ahmednagar News : विविध कंपनीच्या इन्शुरन्स पॉलीसी मार्फत तुम्हाला व्यवसायासाठी दिड कोटी रुपये कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी करुन राहुरी येथील एका व्यापाऱ्याला सुमारे २३ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या १४ जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशपाक आब्बास तांबोळी (वय ५०, रा. सोनगाव, ता. राहुरी) हे सोनगाव येथे गोळी, बिस्कीटचे दुकाण चालवुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाची आवश्यक्ता होती.

(दि. १०) एप्रिल २०२२ ते २० मार्च २०२३ या दरम्यान, अंधेरी वेस्ट येथील काही भामट्यांनी अशपाक तांबोळी यांना वेळोवेळी फोन करून तुम्हाला विविध कंपनीच्या इन्शुरन्स पॉलीसी मॉर्गेज करून त्यावर व्यवसायासाठी झीरो टक्के व्याज दराने दिड कोटी रुपये कर्ज देतो, असे सांगितले.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अशपाक तांबोळी यांनी वेळोवेळी २२ लाख ८६ हजार ५५० रुपयांच्या विविध १९ कंपनीच्या पॉलीसी काढल्या. सदर पॉलीसी काढण्याकरीता अशपाक तांबोळी यांनी २२ लाख ८६ हजार ५५० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यातून पाठविले.

त्यानंतर अशपाक तांबोळी यांनी सदर पॉलीसीवर कर्ज मिळण्याकरीता सदर भामट्यांना वेळोवेळी फोन करुन चौकशी केली. तेव्हा भामट्यांनी आज कर्ज देतो, उद्या देतो, असे सांगुन तांबोळी यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, तसेच कोऱ्या कागदावर सह्या व्हाट्सअॅप मोबाईलवर पाठविण्यास सांगितल्या.

त्याप्रमाणे तांबोळी यांनी सर्वकाही पाठविले. त्यानंतर भामट्यांनी वेळोवेळी उठवा उडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे अशपाक आब्बास तांबोळी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अपर्णा देशमुख (रा. २०२ बी विंग, सागर टच प्लाझा, साकी नाका रोड, अंधेरी वेस्ट) तसेच दिव्या मॅडम, पुजा जाधव, सोनिया मॅडम, निधी शर्मा, संदिप सिंग, नेहा मॅडम, जोशी मॅडम, तनुजा मॅडम, गणेश कांबळे, नम्रता मॅडम, पाटील गोरेगाव, संजीव कुमार व पूजा, अशा १४ जणांवर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe