Ahmednagar News : कार दुभाजकावर आदळली; एक ठार

Published on -

Ahmednagar News : कार रस्ता दुभाजकावर आदळून एकाचा मृत्यू झाला आहे. दिनेश प्रल्हादराव धोडरे (रा. बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला.

संजय शाहूराम धस (रा. क्रांतिनगर, तहसीलकार्यालयाजवळ, बीड) हे कार (एमएच 24 बी एल 1703) मधून बीडवरून पुण्याकडे जात होते. त्यांची कार चास शिवारात रस्ता दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातामध्ये कारमधील दिनेश धोडरे यांचा मृत्यू झाला आहे.

भास्कर वामनराव पवार (वय 50, रा. विनायकनगर, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe