अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- अडचणीच्या काळात अनेक कारखाने बंद पडत असताना माजी आमदार राहुल जगताप यांनी मात्र कारखान्याचे विस्तारीकरण करत चांगले काम केले आहे.
मात्र केंद्रातील भाजप सरकार राज्यातील शेतकऱ्यांना संपवायला निघाले आहे. अशी घणाघाती टीका समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पिंपळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाण पूजन व गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केले.
यावेळी ना.मुंडे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकशाहीची ताकत देशाला दाखवून दिली आहे. शेतकऱ्यांचे आणि कारखान्याचे मनाचे जुळलेले नाते मला फक्त इथे पाहायला मिळाले. शेतकरी आणि कारखाना अशी तुमची नाळ जुळली आहे.
तसेच शेतकऱ्यांनी काळया मातीत पिकविलेल्या शेत मालाला चांगल्या प्रतीचा बाजारभाव मिळालाच पाहिजे असे मुंडे यांनी सांगितले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मंत्री संत्री कोणी नाही सर्व सारखेच असतात उलट मंत्र्यांना तुमच्या पेक्षा त्रास असतो.
सर्वांनी आनंदी राहिले पाहिजे. त्याच प्रमाणे कुकडी कारखान्याच्या चालू वर्षीच्या गळीत हंगामात सर्व शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन करताना उसाच्या रिकवरीवर लक्ष द्यावे, अन्यथा उसाला एफआरपी पेक्षा जादा बाजार भाव देता येत नसल्याचे सांगत राहुल जगताप हे महाराष्ट्रातील एकमेव नेता असेल
जो शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट न देता आल्याने विधानसभेला उभा राहणार नाही. कारखान्याचे चेअरमन माजी आ.राहुल जगताप म्हणाले की, विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत कुंडलिकराव जगताप तात्या यांनी उसाच्या बाजारभावाच्या बाबतीत स्पर्धा तयार केली.
या स्पर्धेत ते जिल्ह्यात आघाडीवर राहिले आहेत आणि मी देखील तात्यांचा पठ्ठा असल्याने स्पर्धेत राहून उसाचा बाजार भाव जिल्ह्यात एक नंबर देणार आहे. साखर कारखाने अडचणीत आणण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, अशा टीका केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम