‘शहराला पूर्णवेळ सक्षम आरोग्य अधिकारी मिळावा’ ; स्मायलिंग अस्मिताच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे मागणी

२५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : गेल्या काही वर्षांत शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून मध्यंतरी तर नागरिक साथीच्या आजारांनी ग्रस्त झाले होते. याला सर्वस्वी महापालिकेचे आरोग्य अधिकारीच जबाबदार आहेत.कारण कनिष्ठ कर्मचारी खूप मनापासून काम करतात,परंतु वरिष्ठांकडून कामाचे नियोजन नसल्या कारणाने सगळा बोजवारा उडत आहे.

त्यामुळे शहराला पूर्णवेळ आरोग्य अधिकारी मिळावा अशी मागणी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या युवती आघाडीच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे करण्यात आली आहे.याबाबत महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,आपण अतिशय कार्यक्षम प्रशासक आहात असे आम्ही अनुभवले आहे.

वर्तमानपत्रात देखील आम्ही आपले काम पाहत असतो.आपण थेट गटारीत उतरून कचरा उचलता,शहर स्वच्छतेचा विडा तुम्ही उचललेला आहे.आम्हाला आशा आहे की आपण आम्हाला खरोखर काम करणारा व नागरिकांशी सुसंवाद ठेवणारा आरोग्य अधिकारी पूर्णवेळ द्याल.अन्यथा येत्या शिवजयंतीला महानगरपालिकेसमोर आंदोलन करू असा इशाराही प्रा. नंदा पांडूळे यांनी दिला.

दरम्यान, स्मायलिंग अस्मिताच्या शिष्टमंडळाला आयुक्त म्हणाले की आम्ही सदैव नगरकरांच्या सेवेत आहोत.आंदोलनाची गरज भासणार नाही,लवकर सक्षम व्यक्ती त्याठिकाणी नेमू,असे आश्वासन दिले.यावेळी पुजा राठोड, निलक्रांती आडबले, लिना ठाकरे, भाग्यश्री नागरगोजे, प्रज्ञा घोरपडे, प्रतिक्षा उदमले, कृतिका बिटेवार, प्रिती शिरसाठ यांसही स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल, धिरज कुमटकर आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe