अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने नगर शहरात शुक्रवारी सायंकाळी अचानक हजेरी लावली. दरम्यान पाऊस आला कि लाईट जाणार हे नित्याचेच झाले आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती. यंदाच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.
यामुळे जिल्हयातील नद्या नाले, ओढे, तलाव आदींसह धरणातील पाण्याची पातळी चांगलीच उंचावली होती. काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर नागरिक देखील या पावसाळलं वैतागले होते.
त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. मात्र आज अचानक पुन्हा एकदा पावसाने शहरात एंट्री केली. पावसाची एंट्री झाली आणि पुढच्या क्षणात वीज गायब झाली.
रस्त्यावर पाणीच पाणी साचले व त्यातच वीज गुल झाल्याने नगरकरांची चांगलीच फजिती झाल्याचे चित्र नगरच्या रस्त्यांवर दिसून आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved