अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील डॉ. विजय देवीचंद मुनोत (वय ५७) यांने माझ्या हाॕॅस्पीटलसमोर तुझ्या मालाची गाडी उभी करू नकोस,
या किरकोळ कारणावरून आपल्या मनोज देवीचंद मुनोत (वय ५५) या आपल्या सख्ख्या लहान भावावर आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ च्या दरम्यान घडली.
या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली.बुधवारी सकाळी ९.११ वाजता श्रीगोंदे तालुक्यातील नगर-दौड रोडवर काष्टी येथील मनोज देवीचंद मुनोत हे गोवर्धन पशुखाद्य केंद्र व किराणा दुकान यामध्ये आलेल्या भुसा मालाचा ट्रक हमालामार्फत खाली करीत हाेते.
त्यावेळी मोठा भाऊ संजीवनी हाॕस्पीटलचे डाॕॅ. विजय देवीचंद मुनोत हे पुढे धावून आले आणि माझ्या हाॕॅस्पीटल समोर मोकळ्या जागेत मालट्रक उभा करू नकोस म्हणून दोघा भावामध्ये वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर मारामारीमध्ये झाले. मनोज मुनोत यांनी डाॕॅ. विजय मुनोत यांना पाईपने डोक्यात मारले.
तेव्हा डाॕॅ. विजय मुनोत यांनी आपल्याजवळील रिव्हाल्व्हरमधून धाकटा भाऊ मनोज मुनोत यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पायावर मांडीला लागली, तर दुसरी गोळी पोटामध्ये लागल्याने ते जागेवर कोसळले. तेव्हा जखमी मनोज मुनोत यांना साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांनी आपल्या गाडीतून दौंड येथे दाखल केले.
नंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी हाॕॅस्पीटलमध्ये दाखल करून उपचार सुरू असून जखमीची परिस्थिती चिंताजनक आहे. घटनेनंतर आरोपी डाॕॅ. विजय मुनोत देखील डोक्याला मार लागल्याने श्रीगोंदे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम