धनादेश न वटल्याने न्यायालयाने ठोठावला कारावास

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- हातउसने घेतलेल्या रकमेच्या परतफेडीपोटी दिलेला धनादेश न वटल्याने दाखल केलेल्या खटल्यात आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला तीन लाख रूपये देण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यू. पी. देववर्षी यांनी दिला आहे.(Ahmednagar District Court)

भिंगार येथील फिर्यादी शेख इरफान रशिद यांनी सन 2012 मध्ये त्याचा मित्र विष्णू हिरा सारस (रा. भिंगार) यास व्हॅन दुरूस्तीसाठी दोन लाख रूपये उसनवार दिले होते.

फिर्यादीने सदर रक्कमेची मागणी केल्यानंतर आरोपीने परतफेडीपोटी धनादेश दिला. मात्र, तो न वटल्याने शेख यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवून धनादेशाच्या रकमेची मागणी केली.

परंतु आरोपीने मुदतीत धनादेशाची रक्कम दिली नाही. म्हणून फिर्यादीने अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपीविरूद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टचे कलम 138 प्रमाणे खटला दाखल केला होता.

आरोपीला दोषी धरून एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व तीन लाख रूपये नुकसान भरपाई आरोपीने फिर्यादीला द्यावी, असे आदेश दिले आहे. खटल्यात फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. शेख हाफिज एन.जहागीरदार व अ‍ॅड. दावर एफ. शेख यांनी काम पाहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe