झेडपीतील ‘त्या’ अभियंत्याला विनयभंग प्रकरणात कोर्टाने सुनावली ही शिक्षा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षद महादेव काकडे याला विनयभंग व धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काकडे हे सध्या पाथर्डी पंचायत समितीत कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये 2010 मध्ये काकडे हे कनिष्ठ अभियंता म्हणून होते.

त्यांच्याविरुद्ध अहमदनगर येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल होता. या खटल्यातील महिला वकिल या न्यायालयात दि.10 जून 2010 रोजी जात होत्या.

या महिला वकिलास अभियंता हर्षद काकडे यांनी धमकावून त्यांचा विनयभंग केला होता. या महिला वकिलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून काकडे याच्याविरुद्ध विनयभंग, धमकाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काकडे यांनी ही संबंधित महिला वकिलाविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र याप्रकरणातून महिला वकिलाची निर्दोष मुक्‍तता करण्यात आली आहे. आरोपी काकडे विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe