चक्क पोलिसच निघाले डिझेल चोर… व्हिडीओ होतोय व्हायरल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी 2 नोव्हेंबरला केडगाव शिवारात चौघांना डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचे सील तोडून डिझेल चोरताना पकडले होते. पकडलेला टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला.(Ahmednagar Crime)

तसेच त्या टँकरमधील डिझेल स्वत: च्या वाहनांमध्ये भरले. काही डिझेल ड्रममध्ये घेऊन जात होते. दरम्यान आता या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान या व्हिडिओनंतर पोलीसच निघाले डिझेल चोर अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, लातुर, नांदेडया जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांवरील वाहनांसाठी थेट मुंबई येथील पेट्रोलियम कंपनीकडून डिझेलचा पुरवठा होतो.

याची वाहतूक करण्यासाठी भाड्याने टँकर लावले आहेत. नगर जिल्ह्यातील चार टँकरचा यामध्ये समावेश आहे. मुंबई येथून टँकरमध्ये डिझेल भरल्यावर ते नगरमार्गे पुढे जाते.

पुढे जाण्यापूर्वी केडगाव शिवारात थांबतात. व टँकरचे सील तोडून काही डिझेल काढून घेतात. 2 नोव्हेंबरच्या रात्री दोन भरलेल्या टँकरमधून डिझेल काढताना चौघांना कोतवाली पोलिसांनी पकडले.

त्यांच्याविरूद्ध कोतवालीत गुन्हा दाखल केला. बिभीषण कातकडे, तुकाराम पाटील, भागवत तांबे, हनुमान सुरे अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. दरम्यान पकडलेले टँकर कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले.

या टँकरमधून स्वत: च्या वाहनांमध्ये डिझेल भरल्याचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. \काही डिझेल ड्रममध्ये भरून ते घेऊन जात असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. यामुळे रक्षकच आता भक्षक बनू लागल्याची प्रतिक्रिया नागरिक बोलू लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe