Ahmednagar News : कोरोना संसर्गाच्या काळात ऑक्सिजनला खूप महत्त्व प्राप्त झाले. ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे मोकळ्या हवेत फिरायला जाणे, उद्यानामध्ये फिरण्यासह योग, प्राणायम, व्यायाम करून आपले आरोग्य चांगले ठेवणे, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे.
कोपरगावातील डॉ. रमेश सोनवणे व सुनंदा सोनवणे या डॉक्टर दाम्पत्याने तब्बल १२ वर्षांपूर्वीच स्वच्छंदातून गच्चीवर बाग फुलवली असून त्यात औषधी वनस्पतींसह शेकडो झाडांचे जतन केले आहे. या त्यांच्या छांदासोबत निसर्गाचे संवर्धनही होत आहे.
डॉ. सोनवणे व त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी धारणगाव रोडच्या नागरे पेट्रोल पंपाजवळील आपल्या टुमदार दुमजली बंगल्याच्या सभोवती व टेरेसवर तब्बल २०० हून अधिक विविध फुलांची झाडे लावून किमया केली आहे. घराच्या शेजारी सुंदर बाग त्यात नारळ, आंबा, चिक्कू, अशी फळझाडे असून त्यातून दैनंदिन उपयोगासाठी फुले,
फळे, औषधे मिळतात व बागकामाचा छंदही जोपासला जातो. थोडे महाग असते; पण आपण लावलेल्या फुलझाडांमुळे व शोभिवंत वनस्पतींमुळे अतिशय रम्य वातावरण तयार होऊन सौंदर्यात भर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध पक्षांनी झाडाझुडपांवर केलेली घरटे त्यांनी जपून ठेवले आहेत. पहिल्यापासून विविध फुलझाडांचे वेड त्यांना होते. त्यावर बागडणारी फुलपाखरे, छोटे पक्षी डॉ. दाम्पत्यानबरोबर येणाऱ्या पाहुण्यासह मित्र परिवार यांच्या मनाला प्रसन्न करतात.
पूर्वी लोकांकडे राहण्यासाठी मोठमोठे वाडे अथवा घरे होती. त्याभोवती खूप मोठी जागा असायची. तिथे फळांची, फुलांची, भाज्यांची झाडे असत. आता पूर्वीचे वाडे गेले. ऐसपैस जागाही गेली. त्यांची जागा आता प्लॉटस आणि उंच इमारतीतील फ्लॅटने घेतली. शहरामध्ये स्वतंत्र प्लॉट ही मध्यमवर्गीयांसाठी कठीण गोष्ट बनली आहे; परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे टेरेस गार्डनच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांचे बागेचे स्वप्न साकार होऊ शकते.
हे डॉ. सोनवणे दाम्पत्याने दाखवून दिले आहे. यामध्ये घराच्या गच्चीवर, व्हरांडा, पोर्च, बाल्कनीमध्ये परसबाग फुलवता येते. यातून दैनंदिन उपयोगासाठी फुले, फळे, औषधे मिळतात व बागकामाचा छंदही जोपासला जातो. आपण लावलेल्या फुलझाडांमुळे व शोभिवंत वनस्पतींमुळे अतिशय रम्य वातावरण तयार होऊन सौंदर्यात भर पडते.
निसर्ग संवर्धनातून आरोग्याला फायदा
घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून केल्यास त्याचा फायदा शेवटी आपल्या आरोग्यालाच होणार असल्याचे डॉ. रमेश सोनवणे यांनी सांगितले.
दोन हजार झाडांची लागवड
डॉ. शेळके यांनी तब्बल दोन हजार फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पतींसह प्रकारच्या औषधी झाडांचे संवर्धन केले आहे. चाफा, कृष्ण कमळ, गोकर्ण, गुलाब, सायली, जाई, जूई, भुईचाफा, तुळशी, वाळा, ओवा, पुदिना, कोरफड, पानफुटी, लिंबू, कडीपाला, गुंजपाला, गवतीचहा अशा अनेक झाडांचे संवर्धन त्यांनी केले आहे.
अशी केली तयार बाग
घरातील सर्व ओल्या व सुक्या कचऱ्यापासून बनवलेले कंपोस्ट खत यासाठी वापरले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाते. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनची सोय केली आहे. नळाचे टिपकणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून त्यावर मधमाशांना पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे.
महिन्याला खते, खुरपणे, अशी मशागत करून काळजी घेतली जात आहे. घसचे तापमान इतरांपेक्षा कमी असल्याचे जाणवते.