मंदिर उभारण्याचा वनवास संपला ! राममंदिराचा लोकार्पण सोहळा दिवे लावून साजरा करा – खा.सुजय विखे पाटील

Published on -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. विकासाच्या विविध योजनांबरोबर अयोध्या येथील श्री प्रभू राम मंदिर उभे राहावे ही देशवासयांची इच्छा पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले आहे.

श्री प्रभू रामचंद्र हे १४ वर्षे वनवास संपून आयोध्या मध्ये आले. त्यावेळी जनतेने दिवे लावून दिवाळी साजरी केली. आता अनेक वर्षांचा मंदिर उभारण्याचा वनवास संपला असून श्री प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये येणार आहे.

या मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तरी आपण सर्व जणांनी मोठ्या उत्साहात दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या ‘पाठपुराव्यातून आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विविध विकास कामाचा शुभारंभ तसेच साखर, डाळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका रूपाली वारे, नगरसेविका संध्या पवार, नगरसेवक सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब ‘पवार, नगरसेवक रामदास आंधळे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!