निवडणुका डोळयासमोर ठेवून अपूर्ण कामाच्या उद्घाटनाचा फार्स ! बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्णच

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या उद्घाटनाचा फार्स करण्यात आल्याचा आरोप निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी केला आहे.

अहमदनगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यावर निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी काम अपूर्ण असतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकार्पण सोहळा करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी घाई केल्याचा आरोप केला आहे.

बाह्यवळण रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. अपूर्ण कामाचा लोकार्पण करण्याचा घाट जिल्ह्यातील नेत्यांनी फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेला आहे. निंबळक येथील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेतच आहे.

अनेक ठिकाणी सूचनाफलक, दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. नॅशनल हायवे उंच बनविण्यात आल्याने निंबळक, नेप्ती तसेच इतर गावांतील शेतकऱ्यांचे रस्त्याअभावी हाल होत आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही.

काम पूर्ण झाल्यानंतर लोकर्पण करणे गरजेचे असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण कामाचे लोकार्पण करण्यात आल्याचा आरोप प्रियंका लामखडे यांनी केला आहे.

बाह्यवळण रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. निंबळक फुलाचे कामदेखील पूर्ण झालेले नाही. नेप्ती, निंबळक परिसरातील शेतकऱ्यांचे रस्त्याअभावी हाल होत आहेत. त्याचा विचार न करता निवडणुकीत फायदा होईल, या उद्देशाने अपूर्ण कामाचे लोकार्पण करण्यात आले आहे. –सौ. प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe