अहिल्यानगर : आजही जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आढळून येतात. यात मराठ्यांच्या पराक्रमाची देखील साक्ष देणारी अनेक ठिकाणे आहेत. यात जामखेड तालुक्यातील खर्डा येथील किल्ला. हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या शेवटच्या लढाईचा साक्षीदार मानतात त्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे.
मात्र सध्या त्याची दुरुस्ती अभावी पडझड सुरू झाली आहे. मात्र या ऐतिहासिक वारसा जपला जावा व आपल्या पुढील पिढीला प्रेरणा मिळावी आपला इतिहास समजावा यासाठी विधानसभा सभापती आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घेतला असून या किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेतला असून मोठा निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्यामुळे आगामी काळात या किल्ल्याचे भाग्य उजळणार आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा शिवपट्टण किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरुस्ती करण्याकरिता सुशोभीकरण,संरक्षण भिंत, बाग बगीचा, विद्युत रोषणाई, नवीन दरवाजा या बाबींचा नव्याने समावेश करून फेरनिविदा काढण्यात यावी तसेच सर्व कामे जलद गतीने करण्यासंदर्भातील कामकाजाचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करण्याची निर्देश विधान परिषदेचे सभापती आमदार प्रा. राम शिंदे दिले. सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत किल्ल्याच्या कामाचा संदर्भात आढावा घेण्यात आला होता.
या बैठकीतील निर्णयामुळे खर्डा किल्ल्याचे भाग्य उजळणार असून होणाऱ्या विकास कामामुळे व येथे येणाऱ्या इतिहास प्रेमी पर्यटकांना व जामखेड तालुक्यातील नागरिकांना मोठी पर्वणीच ठरणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा तसेच गाव स्तरावर असलेल्या महावारसा समिती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना स्मारकाची दागडुजी जतन करताना विचारात घ्याव्यात असे निर्देश यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी दिले.
सभापती राम शिंदे म्हणाले की, स्मारकाच्या ठिकाणी किल्ल्याच्या खंदकातील संरक्षित भिंत,बुरुज खोल्या, यांची दुरुस्ती व संवर्धन करणे तसेच प्रवेश दरवाजा बांधणे संरक्षित भिंत उभारणे, विद्युत रोशनी करणे या बाबींचा समावेश करून फेरनिविदा काढण्यात याव्यात व खर्डा किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीचा कामास एक महिन्याच्या आत अधिकाऱ्यांनी गती द्यावी.
दरम्यान यापूर्वी खर्डा किल्लाच्या परिसरात पुरातत्त्व विभागाने किल्लेला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी रेस्ट हाऊस,हॉटेल व शौचालय बांधण्यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला होता परंतु स्थानिक राजकीय विरोधात हे काम सुरू असताना अचानक बंद पडले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला निधी परत गेला की काय अशी शंका खर्डा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत .