अकोले : मित्रानेच मित्राला गाडीवर गर्दणीच्या डोंगरावर नेऊन लोखंडी रॉडने डोक्यात मारून त्याचा खून केल्याची घटना अकोले शहरात घडली आहे.
अशरफ अतिक शेख (१७ वर्षे ६ महिने, रा. अकोले) असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव असून याबाबत पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार काल रविवारी अतिक नौशाद यांनी दिलेल्या फियांदीनुसार त्यांचा अल्पवयीन मुलगा अशरफ अतिक शेख यास रविवार दि. १८ जुन रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतुन फुस लावुन पळवुन नेले होते.
यावरून अकोले पोलिसांनी गु.र.नं. ३९६/२०२३ नुसार भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. पोलिसांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता रविवारी दुपारी अशरफ अतिक शेख यास मोहिते गाडीवर गर्दणीच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसल्याने
सोमवार दि. १९ जुन २०२३ रोजी सकाळी पोलिसांनी संशयावरून साहील मोहिते यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे बिचारणा केली असता त्याने पोलिसांना गर्दणीच्या डोंगरावर नेऊन तिथेच मित्र अशरफ अतिक शेख याचा खून केला असल्याचे सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले असुन रात्री उशीरापर्यंत अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मुस्लिम समाजाचा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा
मुस्लिम अल्पवयीन मुलाचा खून हा चिथावणीखोर भाषणामुळेच झाला असून यातील मुळ आरोपी व त्यांना चिथावणी देणाऱ्यावर गुन्हे दाखल करुन कडक शासन व्हावे, यासाठी अकोले पोलीस स्टेशनला मोर्चा नेत मुस्लिम समाजाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शहरात शांतता असताना काही लोक मुह्ाम अशांतता निर्माण करुन, दोन धर्मात धार्मिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांना प्रक्षोभक मुलाखती देऊन गुन्हयारी गुन्हे गारी प्रवृत्तीला पाठबळ देत आहेत. या गोष्टी निंदनीय असुन यावर पोलिसांनी तपास करुन कारवाई करावी, असेही म्हटले आहे.