अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सध्या बारावीचे पेपर सुरू असून बारावीचे पेपर फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यातच आज 12 वी चा सायन्स विभागाचा बायोलॉजी या विषयाचाचा पेपर पुन्हा सोशल मीडियावर आला आहे.
दरम्यान तीन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा येथे गणिताचा पेपर परीक्षेच्या आधीच काही तास बाहेर आल्याची घटना घडली होती. याबाबत तातडीने शिक्षण विभागाने श्रीगोंदा येथे जाऊन चौकशी करून शहानिशा केली होती.
यातच पुन्हा असाच प्रकार समोर आल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, बारावी विज्ञान शाखेचा बायोलॉजी विषयाचा पेपर सकाळी परीक्षा आधीच सोशल मीडियावर वायरल झाल्याचे समजते आहे.
याबाबत खुद्द शिक्षण विभागालाच माहिती नसल्याचं बोललं जात आहे. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या बारावी विज्ञान शाखेचा पेपर साडे दहा ते दोन वाजेपर्यंत होता
पेपर सुटल्यानंतर सकाळी साडेनऊच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेबाबत बाबत खात्री केली असता सकाळी झालेल्या व्हायरल प्रश्नपत्रिकेचा कोड नंबर आणि दोन नंतर परीक्षा देऊन बाहेर आलेल्या
मुलांचा प्रश्नपत्रिकेचा कोड नंबर सारखाच असल्याचं समोर आले असून सकाळी बायोलॉजी चा पेपर फुटला असल्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे.