२७ फेब्रुवारी २०२५ राशीन : कर्जत तालुक्यातल्या राशीन गावातून एक हैराण करणारी घटना घडल्याचे समोर आले आहे.राशीन मधील एकाच कुटुंबातलया चार जणांना जेवणातून विषारी औषध दिल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.विषबाधा झालेल्या कुटुंबातील सर्वाना तातडीने दवाखान्यात ऍडमिट केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला असून कुटुंबातील सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमागील खरा सूत्रधार घरातील मुलगीच आहे.मुलिनेच सगळा खटाटोप केल्याचे उघड झाले असून त्याचे कारण असे कि सदर मुलगी काही दिवसांपूर्वी पालकांना न सांगता घरातून बेपत्ता झाली होती.त्यामुळे पालकांनी तिची कर्जत पोलिसात हरवल्याची तक्रार केली होती.या तक्रारीनुसार पोलिसांनी सदर मुलीच्या मोबाइल लोकेशनचा आधार घेत मुलीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि मुलीला त्या पालकांच्या ताब्यात दिले होते.

हि मुलगी घरी आल्यानंतर तिचा तिच्या कुटुंबाशी वाद झाल्यामुळे तिने रागाच्या भरात सर्वांच्या जेवणात विषारी औषध टाकून स्वतः ही ते खाल्ले.घरातल्या सगळ्यानाच त्रास होऊ लागल्यामुळे सर्वांनाच तातडीने राशीन येथील खासगी दवाखान्यात दाखल केले गेले.
आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली असून याबाबत पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. दवाखान्याकडून पोलिसांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेबद्दल पोलिस पुढचा तपास करत आहेत.या संदर्भात गुरुवारी पोलिस गुन्ह्याची अधिकृत नोंद करतील असे सांगण्यात आले.