तब्बल तीन महिन्यापूर्वी अपहरण केलेल्या मुलीचा शोध लागेना: आई वडिलांनी उचलले ‘हे’ पाऊल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  राहुरीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. या बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले; मात्र अद्याप मुलीचा तपास लागला नाही. त्या मुलीचे आई-वडी हेलपाटे मारत आहेत.

शेवटी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, ११वीत शिक्षणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. याबाबत त्या मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी संतोष बाबासाहेब हारदे या तरूणा विरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेला तीन महिने उलटून गेले; मात्र त्या मुलीचा शोध घेण्यास राहुरी पोलिस असमर्थ ठरत आहे. त्या मुलीचे वडील अपंग व आई अशिक्षित आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून ते राहुरी पोलिस ठाण्यात हेलपाटे मारत आहेत. हेलपाटे मारून वैतागलेल्या आई-वडिलांनी अखेर राहुरी पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागत नाही, तसेच या घटनेतील आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा पावित्रा घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe