Shrirampur News : बसस्थानकावर एकटी सापडलेली मुलगी सुखरुप पालकांच्या स्वाधीन

Published on -

Shrirampur News : श्रीरामपूर शहरातील बसस्थानकावर सोमवारी (२५ डिसेंबर) रात्री दहा ते साडे दहा वाजेदरम्यान बस न मिळाल्यामुळे एकट्या बसलेल्या मुलीला टारगटांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार लक्षात येताच, काही युवकांनी संरक्षण देत सुखरूपपणे या मुलीस पालकांच्या स्वाधीन केले. नाशिकहून नेवाशाकडे जाणारी शेवटची बस रात्री बाभळेश्वरमध्ये बंद पडली. त्या बसमधील प्रवाशी मिळेल, त्या साधनाने श्रीरामपूरात रात्री साडेनऊच्या दरम्यान कसेतरी आले.

रात्री आठच्या पुढे श्रीरामपूर बसस्थानकातून एकही बस बाहेर जात नसल्याने संरक्षणाच्या अपेक्षेने बसस्थानकाबाहेर येऊन ही मुलगी उभी राहिली. काही टवाळखोरांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार शाम घाडगे व रितेश खाबिया, अमित मुथा, योगेश ओझा यांच्या लक्षात आला. त्यांनी त्या मुलीची विचारपूस करून नेवाशातील तिच्या पालकांशी संपर्क केला. रात्री अकराच्या दरम्यान तिच्या पालकांच्या ताब्यात मुलीला स्वाधीन करून रवाना केले.

याबाबत बसस्थानक प्रमुख महेश कासार म्हणाले, बसस्थानकावर दोन सुरक्षारक्षक असतात. असे काही घडले असेल, तर संबंधित युवतीने आमच्याशी संपर्क केलेला नाही. सोमवारी (२५ डिसेंबर) नाशिक-शेवगाव गाडी ब्रेकडाऊन झाली होती, मात्र श्रीरामपूर आगाराची बस व मेकॅनिक पाठवून प्रवाशांची सोय केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe