Ahmednagar News : दैवी शक्तीचा महिमा ! अनेक माणसे बसलेल्या १२ बैलगाड्या..ओढतोय फक्त एकटाच भगत

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आपल्याकडे अनेकधर्मीक विधी, जत्रा, यात्रा भरत असतात. विविध धार्मिक स्थळी, मंदिरांत उत्सव भरले जातात. अनेक ठिकाणच्या देवदेवतांचा मोठा महिमा आहे. अनेक ठिकाणी विविध दैवी शक्तीचे चमत्कारही पाहायला मिळाल्याचे अनेक लोक सांगतात.

असाच एक यात्रोत्सव कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथे भरतो. श्री वीरभद्र महाराज यात्रोत्सव मोठा उत्सहात भरतो. या यात्रोत्सवात एकाच भक्ताने अनेक माणसे बसलेल्या तब्बल १२ बैलगाड्या ओढून सर्वांना थक्क केले.

दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो. यंदा भगत बंडू काकडे यांना हा बहुमान मिळाला. मार्गशीर्ष चतुर्थी व पंचमीला श्री वीरभद्र महाराजांच्या मुखवट्याची वाजत गाजत पालखी काढण्यात आली.

असा होता उत्साह

पारंपरिक डफ, ढोल ताशा व बँड वाजवण्यात आला. कर्ण महाल काठी व पालखीचे पूजन करण्यात आले. मंदिरावर फुलांसह विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. दारोदार सडा, रांगोळ्या काढण्यात आल्या.

पंचमीला गोदावरी नदीवरून पाणी आणून श्री वीरभद्र महाराजांना गंगाजलाने अभिषेक करण्यात आला. सायंकाळी १२ गाड्या ओढण्यात आल्या. यात्रेनिमित्त विविध खेळणी, पाळणे, तमाशा मंडळांची हजेरी, पान, फुलांची दुकाने थाटण्यात आली होती.

असा असतो १२ गाड्या ओढण्याचा सोहळा

१२ गाड्या व २ मुख्य गाडा असतात. या गाड्या ३०० फूट लांब असतात. भगत कोणताही आधार न घेता प्रत्येक गाडीमध्ये बसलेल्या अनेक लोकांना ३०० फूट ओढतो. ही या दैवताची किमया समजली जाते. यात्रेचे वैशिष्टये असे की,

मुखवटा एका कुटुंबाने सांभाळणे, पालखीचे भोई, काही समाजाचे गाडा तयार करणे, भगवतांच्या कमरेला आकडा लावणे एका समाजाकडे व आकडा सांभाळणे एका समाजाकडे असे असते. म्हणजे यात्रोत्सव सर्व जाती, धर्माकडून एकत्रित येऊन साजरा करण्यात येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe