शेतीपिकांच्या नुकसानीपोटी रकमेचा शासन निर्णय जारी, शेतकऱ्यांना मिळणार ६०० कोटी, लवकरच बँक खात्यात जमा होणार पैसे !

Published on -

राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल.

जानेवारी ते मे २०२४ या महिन्यांत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.

तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरितादेखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe