सरकारने मंदिरे उघडावी अन्यथा कुलूप तोडू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- मंदिरे हि हिंदूंची शक्ती केंद्रे आहेत.भक्तांच्या दर्शनासाठी ताबडतोब मंदिर उघडावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद करोडो हिंदू समाजाच्यावतीने करत आहे,यासाठी विश्व हिंदू परिषद हा समस्त हिंदू समाजाचा आवाज आहे.

गेली आठ महिने बंद असलेली देवालय भक्तांच्या दर्शनासाठी ताबडतोब मंदिरे सरकारने उघडावी अन्यथा कुलूप तोडू असा इशारा पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसह मंत्री विवेक कुलकर्णी आंदोलन प्रसंगी यांनी दिला. माळीवाडा येथील नगर शहराचे ग्राम दैवत श्री विशाल गणपती मंदिराच्या दारात विश्व हिंदू परिषदेने मंदिर उघडावे,सरकारला जाग यावी यासाठी हलगी व टाळ वाजवून संतांच्या हस्ते महाआरती करून जन आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसह मंत्री विवेक कुलकर्णी बोलत होते. यावेळी प्रांतसेवा विभाग प्रमुख दादाराम ढवाण,संत मुरली दास महाराज,रा.स्व.संघाचे संत संपर्क  ह.भ.प.रामदास महाराज क्षीरसागर,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,मठ मंदिर संपर्क समितीचे हरिभाऊ डोळसे,प्रांत धर्म प्रसार सह प्रमुख मिलिंद मोभारकर,दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप,गणेश मंदिराचे विश्वस्त पंडितराव खरपुडे,बजरंग दलाचे अध्यक्ष गौतम कराळे,धर्मप्रसार प्रमुख अनिल देवराव,

सह प्रमुख कल्याण गाडे,अनिल रामदासी,निलेश चिपाडे.प्रफुल्ल सुरपुरिया,मुकुल गंधे,ज्ञानेश्वर मगर,मोहन पोकळे,राजेंद्र चुंबळकर,राजेश सटाणकर ,बाली जोशी,तुषार मुळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना विवेक कुलकर्णी म्हणाले कि,हिंदू समाज हा धार्मिक व सहिष्णू आहे त्याचा अंत सरकारने पाहू नये.शेकडो वर्षांपूर्वीची दिंडीची परंपरा औरंगजेबाच्या काळातही सुरु होती.परंतु कोरोना या महामारीच्या काळात हिंदू समाज हा धार्मिक व सहिष्णू असल्याने वारी रद्द करून नियमांचे पालन केले.मंदिरांवर अनेक गावांची धर्मस्थानांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

महाराष्ट्र ही जागृत धर्मस्थानांची भूमी आहे.देवींची साडेतीन शक्तीपीठे,बारा जोतिलिंगा पैकी पाच जोतिर्लिंग,अष्टविनायक मंदिरे,जेजुरी जोतिबा सारखी कुलदैवते संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत एकनाथ अशा अनेक संतांच्या कर्मभूमी पंढरपूर सारखे महाराष्ट्राचे आराध्य दैवत,शनिशिंगणापूर, शिर्डी सारखे श्रध्दास्थान,भटक्यांची पंढरी मढी कानिफनाथ देवस्थान,अश्या अनेक तीर्थक्षेत्रांचे  अर्थव्यवहार सद्य कालात ठप्प झाले आहेत.मंदिरांच्या आश्रयाने असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत.गुरव,पुजारी व पुरोहित या वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment