चार दिवसाच्या कर्जत एमआयडीसी सर्व्हेक्षणासाठी सरकारी पथक कोंभळीत दाखल !

Pragati
Published:
karjat midc

कर्जत एमआयडीसी सर्व्हेक्षणासाठी आलेल्या रुपरेखा सर्व्हेक्षण पथकाचे कोंभळी येथील ग्रामस्थांकडून वाजत -गाजत स्वागत करण्यात आले बहुचर्चित कर्जत एमआयडीसीचा प्रश्न कर्जत – जामखेड मतदारसंघासह राज्यभरात चर्चिला जात आहे.

या एमआयडीसीबाबत आ. राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा केल्याने याची दखल घेत राज्य सरकारच्या आदेशानुसार एमआयडीसीच्या सव्र्व्हेक्षणासाठी कोंभळी येथे रूपरेखा सर्व्हेक्षण पथक आज बुधवार (दि.३) जुलै रोजी प्रस्तावित जागेवर दाखल झाले.

या औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्व्हेक्षण पथकाचे येथील ग्रामस्थांच्या वतीने गाजत वाजत स्वागत करण्यात आले. पथकामध्ये एमआयडीसी भूमापक एस.के. राठोड, प्रमुख भूमापक एस. डी. खैर, सर्वेअर वासुदेव गावडे यांचा समावेश आहे.

पथकाकडून एमआयडीसीसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्राची चार दिवस पाहणी करून सर्व्हेक्षण केले जाणार आहे. एमआयडीसीसाठी कर्जत तालुक्यातील कोंभळी, थेरगाव, रवळगाव, या भागात ४८१.९८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावित क्षेत्राचे चार दिवसांमध्ये सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल लवकरच मिळाल्यानंतर सर्व्हेक्षणाचा महत्त्वाचा टप्पा झाल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

या वेळी कर्जत तालुका बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, थेरगावचे सरपंच मिनिनाथ शिंदे, चंद्रकांत महारनवर, आण्णा महारनवर, नागमठाणचे सरपंच देविदास महारनवर, विठ्ठल नन्नवरे, मोहन खेडकर, तात्या खेडकर, कुंडलिक गांगर्डे, मारूती उदमले, सुनिल खंडागळे, सुनिल यादव, रामभाऊ शिंदे, भाऊसाहेब गावडे, वैभव गांगर्डे, अतुल गांगर्डे, अमोल गांगर्डे, भाऊसाहेब गांगर्डे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्जत तालुक्यातील कोंभळी, थेरगाव, रवळगाव या भागात एमआयडीसीसाठी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आल्याने या औद्योगिक वसाहतीला १५ मार्च रोजी उच्चाधिकार समितीकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. बहुचर्चित असलेल्या कर्जत एमआयडीसीमुळे येथील बेरोजगारांचा प्रश्न सुटणार असून, यासाठी आ.राम शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहे.

एमआयडीसी होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी कोर्टात जाण्याची भाष्य करत आहेत. एमआयडीसीला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधी आ. रोहित पवार यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील जनता चपराक देईल, असे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले.

एमआयडीसीचे स्वप्न लवकरच पूर्ण : आ. राम शिंदे
एमआयडीसीचा प्रश्न सोडविण्यास अपयश आल्याने आ. रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांपुढे खोटेनाटे बोलून
आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या प्रश्नांना न्याय मिळत नसेल तर प्रश्न सभागृहात मांडावे एमआयडीसीबाबत प्रस्तावित जागेचा सर्व्हेक्षणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण झाल्यानंतर लवकरच भू-संपादनाची कार्यवाही होईल व एमआयडीसीमुळे येथील बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe