अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- मध्यरात्री आयशर गाडीमधून अकोले तालुक्यातील स्वस्त धान्य काळया बाजारात विकण्यासाठी नेत असताना नवलेवाडी फाट्यावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून गहू, तांदूळ, डाळ असे २०० बॅग धान्य पुन्हा सरकारी गोदामात पाठविले आहे.
तहसीलदार सुरेश थेठे, पोलिस अधिकारी मिथुन घुगे, सर्कल बाबासाहेब दातखिळे, सुनील मुळे, गोडाऊन किपार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक व त्यातील धान्याचा पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतली.
दरम्यान माजी आमदार वैभव पिचड यांनी या धान्याची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा तहसीलदार कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेचे धान्य काळा बाजारात जात असेल
तर लोकप्रतिनिधी करतात काय? असा सवाल उपस्थित करून तहसीलदार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोन दिवसात संबंधितांना अटक करून
चालेलला गैरप्रकार थांबवा अन्यथा तहसीलदार कचेरीसामोर धरणे आंदोलन करणार असे माजी आमदार पिचड यांनी इशारा दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम