नगर जिल्ह्यातील ‘हे’ धरण तिसऱ्यांदा १०० टक्के भरले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- भंडारदरा धरण परिसर तसेच पाणलोटात विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस झाला होता. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे हे धरण तिसऱ्यांदा १०० टक्के भरले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली आहे. गुरूवारी रात्री घाटघर ७६, भंडारदरा २१, पांजरे २५, रतनवाडी २९ मिमी पाऊस झाला.

त्यामुळे १३ दलघफू पाणी नव्याने आले आहे. तसेच ११०३९ दलघफू क्षमतेचे हे धरण आहे. पावसामुळे हे धरण जरी भरले आहे तरी या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe