Ahmednagar Politics : शनैश्वर देवस्थानमधील गैरव्यवहाराचा मुद्दा राज्य लेव्हलला गाजणार ! आमदार गडाखांना घेरण्याची रणनीती सुरु? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

सध्या राजकीय स्थिती कशी बदलेल हे सांगता येत नाही. सध्या विविध नेत्यांना घेरण्याचे, त्यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. राज्यातील व लोकसभेतील निवडणुकांसाठी सध्या विविध डावपेच देखील याच अनुशंघाने आखले जात आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांना घेरण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले असल्याची चर्चा आहे.

निमित्त आहे शनैश्वर देवस्थानवर गैरव्यवहाराचा आरोप. सध्या शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानवर गैरव्यवहाराचा आरोप करत बेमुदत उपोषणाला बसलेले कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांच्या आंदोलनाची दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी घेतली आहे. हा विषय अधिवेशनात देखील मांडणार असल्याचे ते म्हणालेत. म्हणजेच आता या मुद्द्यावरून आमदार गडाखांना घेरण्याची रणनीती सुरु झालीये का अशी चर्चा आहे.

काय आहे प्रकरण ?

सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे हे शनैश्वर देवस्थानावर गंभीर आरोप करत याची चौकशी करावी या मागणीसाठी उपोषणाला बसलेत. शनैश्वर देवस्थानात सुरू असलेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी, नोकर भरतीची चौकशी, विश्वस्त मंडळ बरखास्त करून ते सरकार जमा करावे आदी मागण्या त्यांनी केल्यात.

राष्ट्रपतींचा दौरा झाला आणि त्यानंतर ते उपोषणाला बसले. विशेष म्हणजे याची लगेच दखल भाजपकडून घेण्यात आली. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अशोक टेमक, विठ्ठल लंघे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

थेट बावनकुळे, मंत्री कराड उपोषणकर्त्याच्या भेटीला

हे उपोषण सुरु झाले आणि याची दखल थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी घेतली. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पुढाकारातून या दोघांनी थेट उपोषणकर्ते शेटे यांची भेटच घेतली. या बाबत आता सरकारशी बोलणार असून देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावर चर्चा होईल असेही ते म्हणालेत.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यावर बैठक घ्यायला सांगेल असेही त्यांनी जाहीर करून टाकल्याने आता राजकीय वातावरण तापले आहे. आमदार शंकरराव गडाख यांना घेरण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेली पेरणी आहे का ? कि इतर काही राजकीय गणिते आहेत अशीच चर्चा सध्या रंगली आहे.

आ. गडाखांकडे लक्ष

आता हे ज्या घडामोडी झाल्या आहेत याची दखल घेत आता आ. शंकरराव गडाख कशी घेतात त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता अहमदनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापेल असेही म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe