अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 11 गावांतील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
तसेच लवकरच प्रशासकीय मान्यता मिळताच जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले.
मंत्री तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांची मालिका सुरूच ठेवलेली असून रस्ते, वीज, पाणी या कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत रस्त्याच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे नमूद केले.
दरम्यान तालुक्यातील 11 गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी 7 कोटी 82 लाख 91 हजार 647 रुपये खर्च येणार आहे.यामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम