अवघ्या पंधरा मिनिटांसाठी आलेल्या विजेने ‘त्या’ चिमुरड्याचा जीव घेतला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एक घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व दुसरी घटना पानोडी येथे घडली आहे.

यामध्ये आश्वी बुद्रुक येथिल रमेश राधुजी गायकवाड (वय 65) व पानोडी येथे ओंकार गणेश पवार (वय 14) या दोघांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

पहिली घटना :- पानोडी शिवारातील आश्वी – साकूर रस्त्यालगत असलेल्या पवार वस्तीलगत ओंकार हा मुलासमवेत खेळत होता. यावेळी लगत असलेल्या विजेच्या खांबाला ओंकारचा हात लागल्यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.

विशेष म्हणजे सोमवार व मंगळवार या काळात वीजपुरवठा मोठ्या काळासाठी खंडित होता. अवघ्या पंधरा मिनिटांसाठी वीजपुरवठा सुरळीत झाला असताना ही दुर्दैवी घटना घडली.

दुसरी घटना :- दुसर्‍या एका घटनेत आश्वी बुद्रुक येथिल रमेश गायकवाड यांनाही विजेचा जोरदार धक्का बसल्याची घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही लोणी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र दोघांचाही उपचाराआधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी अशा दुर्घटना घडत आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आपत्ती विभागाकडून वारंवार करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News