निंबळक चर्चअंतर्गत भव्य प्रेअर टॉवरचे शानदार उद्घाटन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-निंबळक चर्च अंतर्गत निंबळक येथे प्रार्थनेसाठी प्रेअर टॉवर उभारण्यात आला आहे. गुड न्यूज हिलिंग मिनिस्ट्री सुवार्ता प्रसार आरोग्यदान सेवा संघाच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या प्रेअर टॉवरचे उद्घाटन रेव्ह.डॉ.विनय दुबे यांच्या हस्ते झाले.

यावेळी निंबळक चर्चचे बिशप तानाजी पाडळे, रेव्ह.दीपक पाडळे, बिशप मनोहर सावंत, मधुकर पडागळे, एम.एस.कदम, राजन कांबळे, शकुंतला पाडळे, रमेश शिंदे, पास्टर प्रभाकर घाटविसावे, छाया पाडळे आदीं उपस्थित होते.

रेव्ह.दीपक पाडळे म्हणाले की, शांती व प्रेमाचा संदेश देणार्‍या प्रभू येशूची करूणा सर्वांवर होण्यासाठी प्रेअर टॉवरची उभारणी करण्यात आली आहे.

याठिकाणी मनोभावे प्रार्थना केल्यास मनातील इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील तसेच दु:ख, वेदना संपुष्टात येतील असा विश्‍वास आहे.

याठिकाणी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत सर्वधर्मियांसाठी प्रार्थना केली जाणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या प्रार्थनेतील शक्तीची अनुभूती घ्यावी.

रेव्ह.डॉ.विनय दुबे म्हणाले की, बिशप तानाजी पाडळे यांचे सेवाकार्य वयाच्या 74 व्या वर्षीही तितक्याच उत्साहात चालू आहे. प्रभू येशूच्या सेवेत व प्रार्थनेत ते कायम मग्न असतात.

श्रध्दा ठेवली तर फळ निश्‍चित मिळते असा संदेश ते येशूची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहचवत असतात. याठिकाणी अतिशय सुंदर प्रेअर टॉवर उभारले असून हे केंद्र प्रत्येकासाठी नवी उर्जा देणारे ठरेल, असा विश्‍वास आहे.

या कार्यक्रमासाठी अहमदनगर डिस्ट्रीक्ट रेव्हरंड अ‍ॅण्ड पास्टर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, संडे स्कूल टिचर्स, बायबल स्कूल टिचर्स स्टाफचे सदस्य तसेच पुरुष व महिला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment