विकत घेतलेली शेती परत न दिल्याने मोटारसायकल पेटवली

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन तू आम्हाला परत का देत नाहीस? असे म्हणत एकाने शेताजवळ लावलेली मोटारसायकल पेटवून दिली. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील जवळा येथील (मुळ रहिवासी हल्ली रा. कात्रज कोंढवा रोड, टिळकनगर पुणे) येथील रहिवासी फिर्यादी गणेश रामभाऊ हजारे (वय २७) यांचे वडील रामभाऊ हजारे यांनी जवळा गावातील महेबुब गुलाब शेख यांच्या मालकिची जवळा गावात शेतगट नंबर २६५ मध्ये असलेली शेतजमीन १६ वर्षापुर्वी विकत घेतलेली आहे.

१६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी व त्याचे वडील दोघेजण मोटारसायकलवर जवळा गावच्या शिवारातील शेतात गेले होते. यावेळी तेथे नबाब महेबुब शेख (रा. जवळा ता. जामखेड) हा तेथे आला व फिर्यादी गणेश रामभाऊ हजारे (वय २७ वर्षे हल्ली रा. कात्रज कोंढवा रोड, टिळकनगर पुणे मुळ रा. जवळा ता. जामखेड ) यास म्हणाला की,

तुझ्या वडीलांनी माझ्या वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन आम्हाला तु परत का देत नाहीस. असे म्हणून शेताजवळ लावलेली फिर्यादीची मोटारसायकल (क्र.एम.एच.१२ एस. एच १४६९) ही जाळून टाकून नुकसान केले.

या प्रकरणी गणेश रामभाऊ हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नबाब महेबुब शेख याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संजय लोखंडे, नवनाथ शेकडे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe