Shirdi News : अवैध धंद्यामुळे शिर्डी शहराचे नाव बदनाम ! साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरत बिंगो मटका

Published on -

Shirdi News : शिर्डी शहरात असलेल्या साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरत बिंगो मटका खेळला जात आहे. तसेच साई भक्तांना टिळा लावणारे अल्पवयीन मुले-मुली यांच्यात व्यसनाधीनता वाढली आहे. यासाठी शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख संजय शिंदे यांनी केली आहे.

याबाबत पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की, शहरात साई भक्तांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. साईंच्या कृपादृष्टीमुळे शिर्डी शहराचा विकास झाला आहे.

परंतु शिर्डी नगरी सुरू असलेला अवैध धंद्यामुळे शिर्डी शहराचे नाव बदनाम होत आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे एकूण शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ अवैध व्यवसाय बंद केली पाहिजे.

या व्यवसायाचा त्रास शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना होत आहे. याबाबत शिर्डी पोलिसांकडे अनेकदा मागणी करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे या प्रश्न लवकरच जिल्हा पोलीस प्रमुख प्रमुख राकेश ओला यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहे. तसेच पोलीस प्रशासनाने अवैध व्यवसाय तात्काळ बंद न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News