शेवगाव शहरातील नगरसेवकांची संख्या 21 वरून 24 होणार…प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे रवाना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव नगरपरिषदेची निवडणुक मुदत 7 फेब्रुवारी 2020 रोजी संपुष्टात आली असून त्यानंतर नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव नगरपरिषदेने संख्या निश्चितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिली.

याबाबत प्रभारी मुख्याधिकारी लांडगे यांनी सांगितले की, 2011 च्या जनगणनेनुसार शेवगाव शहराची लोकसंख्या 38 हजार 375 असल्याने व त्यानंतर करोनामुळे 2021 ची जनगणना रखडली आहे.

2011 च्या जनगणनेनंतर वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून सदस्य संख्या निश्चितेचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

त्यामुळे सरकारच्या निर्देशानुसार वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून 21 ऐवजी 24 जागांचा प्रस्ताव मंजुरीकरिता नुकताच पाठविण्यात आला आहे.

त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नव्याने निवडणूक पूर्व प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने नगरसेवकांची संख्या निश्चितीनंतर नव्याने प्रभाग रचना,

आरक्षण, मतदार यादी आदी सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe