लम्पी बळींची संख्या हजारावर, अहमदनगरमध्ये परिस्थिती गंभीर

Published on -

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणानंतरही जनावरांमधील लम्पी हा चर्मरोग नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येते. गोवंशीय जनावरे या रोगाला बळी पडत आहेत.

या रोगाने मृत झालेल्या जनावरांची संख्या आता १०४० झाली आहे. तर १६ हजार ६०० जनावरे या रोगाने बाधित आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सुमारे १६ लाख जनावरे आहेत. त्यातील १५ लाख जनावारांचे लसीकरण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरीही लम्पी रोगाची बाधा आणि मृत्यू होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे.

या परिणाम दुग्ध व्यावसाय, शेतीची कामे आणि साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर होणार आहे. याशिवाय नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू असून यासाठी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे कष्ट आणि खर्चही येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News