तुळजाभवानी देवीच्या पालखीचे माजी मंत्री शिवाज कर्डिले यांच्या हस्ते विधिवत पूजा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-सालाबादप्रमाणे तुळजाभवानी देवीची पालखी राहुरी येथून प्रस्थान होऊन पारनेर, नगर तालुका, नगर शहर व नवरात्रीच्या तिसऱ्या माळीला बुऱहाणनगरवरुन भिंगार, तुळजापूर अशी मार्गस्थ होत असते.

परंतु देशावर आलेल्या संकटामुळे सर्वसालाबादप्रमाणे असलेले मार्ग बदलून राहुरीवरुन बुऱ्हाणनगर जगदंबा देवी मंदिर येथे असताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानासमोर आली असता पालखीचे विधीवत पुजा व आरती करण्यात आली.

यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेकडे आपल्यावर आलेले कोरानाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, अलकाताई कर्डिले, अक्षय कर्डिले, संदीप कर्डिले, पारनेरचे नगराध्यक्ष शंकर नगरे, नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, उद्योजक सुखदेव पवार,

देवीच्या पालखीचे भक्त सुदाम भगत, ज्ञानेश्वर भगत, देवीदास भगत, सागर भगत संतोष भगत, वसंत भगत, सुरेंद्र भगत, दीपक भगत, खंडू भगत, मंगेश भगत, अमोल धाडगे, सोमनाथ वामन व इंजि. साळुंके उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment