विधानसभा निवडणुकीपूर्वीच मंत्री विखे पाटील यांच्‍यावर पक्षाने दिली ‘ही’ विशेष जबाबदारी

Published on -

Ahmednagar news : राज्यात विधानसभेच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देखील लाभार्थ्‍यांशी चांगला संपर्क व्‍हावा या दृष्‍टीने मंत्री विखे पाटील यांच्‍यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे.

लाभार्थ्‍यांच्‍या संपर्कासाठी निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. या समितीच्‍या माध्‍यमातून विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, या समितीमध्ये महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची लाभार्थी संपर्क समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने तयार केलेल्या व्यवस्थापन समितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून, प्रमुख समित्यांची जबाबदारी अन्य नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.

यामध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विविध योजनांच्या लाभार्थीच्या संपर्क समितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी ना. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली आहे.

अनेक योजनांच्या यशस्वीतेमध्ये नगर जिल्हा हा राज्यात अग्रस्थानी आहे. योजनांचा लाभ सामान्य माणसाला मिळावा म्हणून शासन आपल्या दारी तसेच महसूल सप्ताहाच्या माध्यमातून ना. विखे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांशी चांगला संपर्क व्हावा यादृष्टीने पक्षाने विशेष जबाबदारी ना. विखे पाटील यांच्यावर सोपविली असून, लाभार्थ्यांच्या संपर्कासाठी या समितीच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!