पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खिशातील १७ हजारांची रोकड लांबवली

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  पाथर्डी शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. चक्क एका पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक संदीप भगवान फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात ज्ञानदेव कोंडीराम केळगंद्रे, प्रकाश नामदेव केळगंद्रे, सचिन गोरख केळगंद्रे, अक्षय ज्ञानदेव केळगंद्रे (सर्व रा. पागोरी, पिंपळगाव ता.पाथर्डी) राहुल बापुराव त्र्यंबके,

लतीफ शेख (गाव माहित नाही) व अनोळखी तीन अशा एकूण नऊ लोकांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील संदीप भगवान फुंदे मुंबई येथे पोलिस खात्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.फुंदे यांनी पाथर्डी शहरातील एका मेडिकल दुकानासमोर ते आपली चार चाकी रस्त्याच्या कडेला पार्क करत होते.

त्यावेळी पाठीमागे असलेल्या एका चारचाकी गाडीच्या पुढील बंपरला फुंदे यांच्या गाडीचा धक्का लागला. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe