राजकीय स्थिती चिंताजनक, सामान्यांसह राज्याचे हित जोपासणाऱ्या दिग्गजांची पोकळी. ऍड. प्रताप ढाकणे यांचा भावनेला हात

Ahmednagarlive24 office
Published:

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे अलीकडील काही दिवसात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी ते अचानक विखे व राजळे यांच्या कार्यक्रमात जाऊन आश्चर्यकारक हजेरी लावून आले.

आता त्यांनी राजकीय स्थिती मांडत दिग्गजांची आठवण काढत भावनेला हात घातला. निमित्त होते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातव बेडशीट व रुग्णांना फळांचे वाटप.

 काय म्हणाले ऍड. प्रताप ढाकणे :- राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, आर. आर .पाटील, विलासराव देशमुख अशा दिग्गज नेत्यांची पोकळी आता जाणवते. हे नेते राजकारण व सत्ताकारणापलीकडे जाऊन त्यांनी सामान्यांसह राज्याचे हित जोपासणारे नेते होते असे जोपासले, असे अॅड. प्रताप ढाकणे म्हणाले.

रुग्णालयाच्या अधीक्षक व सर्व कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करताना बेडशीटची तातडीची गरज वाटल्याने मुंडे यांच्या स्मरणार्थ व पवार यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त २०० बेड शीट देण्याचा निर्णय घेतला असे ढाकणे म्हणाले. त्यांनीराजकीय टिपण्णी करत म्हटले की, राज्यातील राजकीय दूषित वातावरण पाहिल्यास, या दिग्गज नेत्यांसह यशवंतराव चव्हाण यांची तीव्रतेने आठवण येते. चव्हाण यांचा वारसा ज्येष्ठ नेते शरद पवार चालवत असून, संपूर्ण राज्याने पक्षभेद विसरून शरद पवारांसोबत काम करण्याची गरज आहे.

माजी मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांच्या आठवणींना उजाळा :- या कार्यक्रमावेळी ढाकणे यांनी माजी मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, माजी मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर पहिले काम उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देण्याचे केले. नगर ग्रामीणमध्ये त्या काळी एवढे भव्य हॉस्पिटल कुठे नव्हते. आता सध्या रुग्णालयाकडे शासनाचे गांभीर्याने लक्ष नाही. निधी अभावी मूलभूत साधन सामग्रीची टंचाई भासते असे ते म्हणाले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe