यांत्रिक युगात गाढवांचीही वाढली किंमत : मढीच्या बाजारात गाढवांना मिळाली इतकी मोठी किंमत

Published on -

अहिल्यानगर : मढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी आली होती. यावर्षी गाढवांच्या खरेदी विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे बोलले जात होते. श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार राज्यातच नव्हे तर देशात मोठा चर्चेचा विषय मानला जातो.

या यात्रेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान मधून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी येतात आणि या खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल या दिवशी होते. यावर्षी गाढवांची संख्या कमी असली तरी गाढवांच्या खरेदीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे सागर पवार आकाश शिंदे योगेश खरात या गाढव खरेदीदारांनी सांगितले. किंमत वाढली असली तरी मढी येथे गाढवांच्या बाजारातील मजा निघुन गेल्या सारखी होती.

काठेवाडी जातीची केवळ चाळीस ते साठ गाढवे विक्रीसाठी आलेली होती. त्यांची किंमत पंचवीस हजारापासुन ते एक लाख रुपया पर्यंत होती. गावरान सुमारे दोनशे ते अडीचशे गाढवे बाजारत दाखल झाली होती. दहा हजारापासुन ते पंचवीस हजार रुपयार्पंयत गावरान गाढवांची किंमत होती.

हजारो गाढवे विक्रीसाठी येत असल्याची परंपरा कमी होत चालली आहे. गेल्या वर्षी गाढवांचा बाजार हा तिसगाव परीसरातच भरला होता. यावेळी मात्र मढी यात्रेत ही गाढवे हजर झालेली दिसले.राज्यात प्रसिद्ध असलेला गाढवांचा मढीतील बाजार हा अखेरचा घटका मोजताना दिसतो आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe