अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता जातीऐवजी या वस्त्यांना समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात घेण्यात आलेल्या या नव्या निर्णयानुसार आता अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारे 1007 ठिकाणी जातीनूसार वस्त्यांची नावे असून ती बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात समाज कल्याण विभागाने यासाठी प्रक्रिया सुरू केली असून 653 ठिकाणी ग्रामसभा घेवून जातीऐवजी अन्य नावे त्याठिकाणी देण्यात येणार आहे.
संंबंधीत वस्तीमध्ये झालेल्या ग्रामसभेच्या ठरावासह पंचायत समिती मार्फत नाव बदला प्रस्ताव जिल्हा परिषद आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त हे सर्व ठराव राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात येणार असून शासन पातळीवर संंबंधीत वस्त्यांची नावे बदलण्याचे गॅझेट प्रसिध्द झाल्यानंतर संबंधीत वस्तीला नवीन नावे मिळणर आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम