Ahmednagar News : मागील नऊ वर्षांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत राहिलेल्या केंद्र सरकारने पारदर्शक कारभार करून भ्रष्टाचारमुक्त देश, असा संदेश संपूर्ण जगाला दिल्यामुळेच
खऱ्या अर्थाने देश मेट्रो सारख्या प्रभावी योजना राबवून जगामध्ये एक बलशाली देश म्हणून नावारुपाला आला, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ग्रामस्थांना साखर वाटपाचा कार्यक्रम व विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. विखे होते. ते पुढे काँग्रेसच्या कार्य काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला होता, त्यामुळे देश अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करत होता;
परंतु या देशातील सुज्ञ नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम पंतप्रधान या देशाला देऊन भ्रष्टाचारमुक्त असा कारभार नऊ वर्षाच्या कार्य काळामध्ये केल्यामुळेच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती झाली आहे.
देशाच्या प्रगतीमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाण्याचीदेखील हिम्मत आता कोणाची राहिली नाही. साखर वाटप हा एक सामाजिक उपक्रम असून, विरोधक मात्र आमच्या साखरेचे राजकारण करत आहेत. विरोधकांना आमची साखर न खाता कडू लागत आहे, असा मिश्किल टोलादेखील खा. विखे यांनी लगावला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे, माजी सभापती काशिनाथ लंवाडे, बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे, वैभव खलाटे, जिजाबापु लोढे, मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, सरपंच चारुदत्त वाघ, डॉ. गवळी, साहेबराव गवळी, महादेव कुटे, संतोष शिंदे, सोमनाथ झाडे, एकनाथ झाडे,
आण्णासाहेब शिदे, डॉ. बबन नरसाळे, डॉ. अमोल नरसाळे, विजय कोरडे, राजेंद्र तागड, कारभारी गवळी, विकास मिरपगार, दिपक डहाळे, छावा संघटना जिल्हाध्यक्ष पवार, रावसाहेब काळे, यंशवत सेनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ वनारसे, भलभिम बनकर, नामदेव वेताळ महाराज, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी वेताळ मेजर यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी यांनी आभार मानले.