कचरा डेपोची संरक्षक भिंत तोडून उभारला तिसरा दरवाजा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- महापालिकेच्या बुरूडगाव येथील कचरा डेपोची संरक्षक भिंत तोडून तिसरा दरवाजा तयार करण्यात आला आहे.

सात फूट उंचीची भिंत तोडून हा दरवाजा तयार केला जात असून, दोन दरवाजे असताना तिसरा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या बुरूडगाव येथे कचरा डेपो आहे.

२० एकरवर कचरा डेपो उभारण्यात आला आहे. कचरा डेपोत अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. कचरा डेपोच्या प्रवेशद्वारापासून रस्ता क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

त्यामुळे हा रस्ता पुढील २८ दिवस बंद ठेवावा लागणार आहे. दरम्यान कचरा वाहतूक करणारी वाहने आत नेण्यासाठी व बाहेर सोडण्यासाठी, असे दोन दरवाजे आहेत.

मात्र पर्यायी रस्ता हवा असल्याने शुक्रवारी तिसरा दरवाजा बसविण्यासाठी संरक्षक भिंत तोडण्यात आली आहे. महापालिकेच्या बुरूडगाव

येथील कचरा डेपोमुळे परिसरात प्रदूषण होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने कचरा डेपोभोवती सात फूट उंचीची क्राँक्रीटची भिंत उभारण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe