नगर- करमाळा या रेल्वे मार्गाबाबत रेल्वे प्रशासनाकडुन लवकरच सकारात्मक निर्णय होईल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :-  नगर- करमाळा या नविन रेल्वे मार्गास रेल्वे प्रशासनाकडुन लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रणजित श्रीगोड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे.

नविन जादा रेल्वे मार्गाला १५ हजार कोटी रुपयाचे खर्च अपेक्षीत आहे. मान्यता मिळण्यास सन २०२२ ते २०२५ पर्यंत हा रेल्वे मार्ग होवु शकतो. नविन रेल्वे मार्गातील जमिनी संपादन करताना पर्यावराणाचा धोका देखील उभा राहणार नाही व औद्योगिक विकासाला नविन दिशा मिळेल.

या नविन रेल्वे मार्ग कर्जत तालुक्यातील मार्गावरुन जाण्याची दाट शक्यता आहे. हा निर्णय लवकरच घेण्यात यावा या करीता लोकप्रतिनीधी मार्फत लक्ष वेधणार असल्याचे रणजित श्रीगोड यांनी सांगितले.

दरम्यान अनेक रेल्वे मार्गावरील वाढता ताण व होणारा त्रास लक्षात घेवुन अनेक मार्गावर जलद प्रवासासाठी काही रेल्वे मार्ग तयार करुन तेे जोडण्याचा महत्वाचा विचार रेल्वे प्रशासनाकडून होत आहे.

नगर – करमाळा असा रेल्वे मार्ग करण्याचा विचार असून तो सोलापूर- दौंड या रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे. मनमाड रेल्वे मार्गावरुन सोलापूरकडे धावणाऱ्या प्रवासी व मालवाहतूक रेल्वे गाड्या दौंड रेल्वे जक्शनवर न जाता या रेल्वे मार्गावरुन जातील. त्यामुळे वेळेची बचत होईल व आर्थिक बचत होणार आहे.

नवी दिल्ली -बेंगलोर कर्नाटक एक्सप्रेस, अहमदाबाद बेंगलोर, शिर्डीहुन सुटणाऱ्या म्हैसुर, चेन्नई आदी रेल्वे गाड्या या रेल्वे मार्गावरुन जातील. भविष्यात नगर रेल्वे स्टेशन दौंड रेल्वे जक्शनपेक्षा मोठे होणार आहे. भारतीय रेल्वेत महत्वाचे स्थान निर्माण होईल.

नियोजीत नगर -परळी रेल्वे मार्ग करमाळा हे दोन रेल्वे मार्ग देखील जोडले जातील. तसेच कल्याण, मुरबाड, नगर, औरंगाबाद, पुणे हे दोन प्रस्तावित रेल्वेमार्ग देखील जोडले जातील व भविष्यात नव्याने जादा रेल्वे सुरु होतील, असे विश्वास श्रीगोड यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe